गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
1. पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं. - पुणे (32 ट्रीप)
गाडी क्रमांक 01921 पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं. साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस पुण्याहून दिनांक 14.3.2024 ते 27.06.2024 या कालावधीत दर गुरुवारी 15.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01922 वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं. - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर बुधवारी दिनांक 13.3.2024 ते 26.06.2024 पर्यंत वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं. येथून 12.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बीना आणि ललितपूर.
रचना: एकूण 17 ICF कोच:- एक AC-2 टियर, 5 AC-3 टियर, 5 स्लीपर क्लास, 6 सामान्य द्वितीय श्रेणी सह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.
2. दौंड – अजमेर – दौंड (8 ट्रिप)
गाडी क्रमांक 09626 दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दिनांक 15.3.2024 ते 05.4.2024 पर्यंत दर शुक्रवारी 23.10 वाजता दौंडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.40 वाजता अजमेरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 09625 अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दिनांक 14.3.2024 ते 04.4.2024 पर्यंत दर गुरुवारी अजमेरहून 17.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.20 वाजता दौंडला पोहोचेल.
थांबे: पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, भवानी मंडी, रामगंजमंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, किशनगड आणि मदार जंक्शन.
रचना: एकूण 18 ICF कोच:- एक AC-2 टियर, 6 AC-3 टियर, 7 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी सह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 01921आणि 09626चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर खुले आहे.
होळी सणासाठी झाशी आणि अजमेर पर्यंत विशेष जादा गाड्या
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ ११:१६:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ ११:१६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: