पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे संस्थेच्या चिंचवड येथील प्रांगणात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
समानतेला प्राधान्य देण्यासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक महिला दिनाचे महत्व व माहिती संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विशद केली. याप्रसंगी एटॉस लि.च्या प्रशिक्षकांनी महिला दिना निमित्त आयआयएमएस च्या विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेतील महिला प्राध्यापक व अन्य महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी फुलझाडांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक कलाप्रकार सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रा. युगंधरा पाटील यांनी आभार मानले.
Reviewed by ANN news network
on
३/१०/२०२४ १०:५७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: