कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या मागणीला यश.
जास्तीत जास्त प्रवाशी वर्गांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन.
विठ्ठल ममताबादे
उरण :हिंदुच्या अनेक महत्वाच्या सणापैकी होळी हा एक महत्वाचा सण असून कोकण विभागात खेडोपाडी गावोगावी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई नवी मुंबई आदी ठिकाणी काम करत असलेले नोकरदार कामगार वर्ग, चाकरमानी होळी सण मोठया उत्साहात साजरे करण्यासाठी आपल्या गावी कोकणात जात असतात.कोकणात होळी सणासाठी प्रवास करताना कोकणी माणसाला, नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नये,कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा आनंदाचा सुलभ व्हावा या दुष्टीकोनातून दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था (उरण) च्या पाठपुराव्याने उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी व उरण मध्ये परत येण्यासाठी ज्यादा बसेस सोडल्या जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था (उरण)तर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती .सदर कोकणात बसेस सोडण्यासाठी संस्थेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनी उरण बस आगार तसेच मुख्य कार्यालय असलेल्या मुंबई कार्यालय मध्येही पत्रव्यवहार केलेला होता .उरण ते रत्नागिरी, उरण ते खेड, उरण ते देवरुख, उरण ते कणकवली, उरण ते गणपतीपुळे या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्याची मागणी कोकण वासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण बस आगार व्यवस्थापक अमोल दराडे यांना करण्यात आली होती . आगाराचे व्यवस्थापक अमोल दराडे यांनी या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला आता यश आले असून रात्री ८ वाजता उरण आगार ते गणपती पुळे या मार्गावर बस सोडण्यात येत आहे. सदर बस सेवा दिनांक २० तारखेला सुरु झाली आहे.२० मार्चला पहिली बस सोडण्यात आली आहे.ही बससेवा २३ मार्च २०२३ तारखेपर्यंत सुरु आहे.कोकणात जाण्यासाठी व कोकणातुन परत उरण मध्ये येण्याचीही व्यवस्था बस द्वारे करण्यात आली आहे. तरी प्रवाशी वर्गांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकणवासीय उत्कर्ष संस्था व उरण बस आगार तर्फे करण्यात आले आहे.
उरण आगारातून होळीकरिता कोकणात जाण्यासाठी जादा बसेस
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०८:२८:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०८:२८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: