'मोऱ्या' २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार!

 


मुंबई : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथात्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट मराठीसोबतच हिंदीतामिळतेलगूकन्नड या भाषांमध्ये येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तमाम रसिकांमध्ये मोऱ्या बद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले आहे.

एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्याया चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय तंतोतंत सफाई कर्मचाऱ्यांचं आयुष्य उभं करतं. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णीराजेश अहिवलेसहनिर्माते प्रेरणा धजेकरपूनम नागपूरकरमंदार मांडकेराहुल रोकडेसचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक - संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगतापसंजय भदाणेधनश्री पाटीलराहुल रोकडेबालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. संगीतकार-अमोघ इनामदारगायक अवधूत गुप्ते तर DOP आकाश काकडे आहेत. सहाय्यक दिग्दर्शन श्रेयस गौतमकरण मोरे यांचे आहे. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा 'मोऱ्या२२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.


'मोऱ्या' २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार! 'मोऱ्या' २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार! Reviewed by ANN news network on ३/१७/२०२४ ०२:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".