येरवडा कारागृहातील कैद्यांना आयुष्यमान भारत आणि ई-श्रम कार्डचे वाटप


पुणे :  येरवडा मध्यवर्ती कारागृहातील दोनशे कैद्यांना दि. १५ मार्च रोजी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी व पाँडेचरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत कार्ड’ व ‘ई-श्रम कार्ड’चे वाटप करण्यात आले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे उपस्थित होत्या.

राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरणाचे ‘आयुष्यमान भारत कार्ड’ व श्रम व रोजगार मंत्रालयाचे ‘ई-श्रम कार्ड’ यांची ऑनलाईन नोंदणी समता फाउंडेशनतर्फे १२ मार्च पासून सुरु करण्यात आली होती. या कार्डचे वाटप १५ मार्च रोजी करण्यात आले. 

हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग पुणे स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

येरवडा कारागृहातील कैद्यांना आयुष्यमान भारत आणि ई-श्रम कार्डचे वाटप  येरवडा कारागृहातील कैद्यांना आयुष्यमान भारत आणि ई-श्रम कार्डचे वाटप Reviewed by ANN news network on ३/१७/२०२४ ०४:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".