२५ वर्षानंतर पुन्हा पहा आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी काळजाला भिडणारा अभिनय!


 

'जन्मऋण'चे गुपित २२ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात पहा!

मुंबई: लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिकानिर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या सुसंस्कृत मराठमोळ्या कुटुंबात घडलेल्या सत्यघटनेवर त्यांनी 'जन्मऋणया नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनोरंजनातून प्रभोधन करीत थेट प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळविण्यासाठी 'आभाळमायाया पहिल्या लोकप्रिय दैनंदिन मालिकेतील जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची साथ त्यांना लाभली आहे.

आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना कलम-5’ तर्फे तुरुंगवासही भोगाव लागतो. समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केलेले आहे. आतापर्यंत आपण त्यांना चित्रपटाच्या व दूरदर्शनच्या माध्यमातून ओळखतो एक सकस कलाकृती घेऊन त्या तुमच्या भेटीला २२ मार्चपासून येत आहेत.

गणेश फिल्म्स’ निर्मित आणि श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत 'जन्मऋणचित्रपटाच्या लेखिकानिर्मातीदिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात मनोज जोशीसुकन्या कुलकर्णीसुशांत शेलारतुषार आर.के.अनघा अतुलशशी पेंडसेप्रज्ञा करंदीकरधनंजय मांद्रेकरदर्पण जाधवविराज जोशीकपील पेंडसेसिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूरनिहारिका रायजादा यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसलेवैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.

येत्या २२ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.

२५ वर्षानंतर पुन्हा पहा आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी काळजाला भिडणारा अभिनय! २५ वर्षानंतर पुन्हा पहा आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी काळजाला भिडणारा अभिनय! Reviewed by ANN news network on ३/१७/२०२४ ०२:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".