आरोग्य विभागातील रिक्तपदे भरा, औषधांचा तुटवडा दूर करा : सतीश कांबळे



आरोग्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

पुणे : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तसेच राज्यभरात औषधांचा तुटवडा आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम रुग्ण तापसणी व राज्याच्या आरोग्यसेवेवर होत आहे. ही चिंताजनक परिस्थिती सुधारून जनतेची हेळसांड रोखण्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर रिक्तपदांची भरती करावी. तसेच औषधांचा तुटवडा दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्य प्रमुख सतीश  कांबळे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात कांबळे यांनी मंत्री तानाजी सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "सध्या राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची स्थिती चिंताजनक आहे. डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, रुग्णालय इमारतींची दुरवस्था अशा समस्यांनी आपली राज्याची आरोग्यसेवा ग्रस्त झाली आहे. रिक्त पदांमुळे अपुऱ्या मनुष्यबळावर आरोग्य सेवा अक्षरशः व्हेंटिलेटरवर काम करत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचा थेट परिणाम रुग्णसेवा आणि आरोग्यसेवेवर होत आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर असणे योग्य नाही. त्याची गंभीर दखल घेऊन शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत. रिक्त पदांची युद्ध पातळीवर भरती करण्यात यावी. तसेच राज्यातील औषध तुटवडा दूर करण्यासाठी आवश्यक औषधांची तातडीने खरेदी करून ते सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत. जनतेच्या आरोग्याची होणारी हेळसांड शासनाने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे."

आरोग्य विभागातील रिक्तपदे भरा, औषधांचा तुटवडा दूर करा : सतीश कांबळे  आरोग्य विभागातील रिक्तपदे भरा, औषधांचा तुटवडा दूर करा : सतीश कांबळे Reviewed by ANN news network on ३/०४/२०२४ ०५:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".