पिंपरी चिंचवड दरोडाविरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने भोसरी एम.आय.डी.सी. येथून दोघांना आणि आणि कामोठे येथे एकाला अटक करून १५ लाख १५ हजार ६७८ रुपयांचे बनावट हार्पिक, लायझॉल, कॉलिन, रिन आला, गुडनाईट जप्त केले आहे.
या प्रकरणी कॉपीराईट अधिकारी अशरफुददीन फयाजुददीन इनामदार वय ४० वर्षे, शास्त्रीनगर दत्तमंदीराजवळ, रहाटणी पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भावेश लक्ष्मण पटेल वय ५८ वर्षे रा. पोस्ट - तोरनिया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात आणि अन्वर भचुभाई, खलिफा वय ३० वर्षे रा. पोस्ट - लाकडीया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात सध्या दोघेही राहणार हायटेक शॉट ब्लास्ट, प्लॉट नं. १४७, सेक्टर नं. २ इंद्रायणीनगर भोसरी पुणे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख २२ हजार ४५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या आरोपींकडे तपास केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कामोठे, नवी मुंबई येथे जाऊन मंजी हरि भासडीया वय ४१ वर्षे रा. रुम नं. ६०२, साई पुजा बिल्डींग, प्लॉट नंबर ६७ सेक्टर ३५ कामोठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून त्याने स.नं. ७६ काम व्हेअर हाऊस न्यू एकता वजन काटयाजवळ शॉप नं.४ ठाणे येथे एक गोडाऊन वजा कंपनीमध्ये तयार केलेला १२ लाख ९३ हजार २२२ रुपयांचा जप्त करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनर, सतीश माने, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा