रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते 14 लाभार्थ्यांना फिरत्या विक्री केंद्राचे आज वितरण करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात रोहित लाड, महम्मदहुसेन सोलकर, संतोष मुकनाक, माधवी दाते, प्रणाली खवळे, महेंद्र म्हापुसकर, अलिशा चंदावले, सचीन जमादार, अक्षय सुर्वे, प्रणित लोध, मयुरेश वरेकर, रविंद्र थुल, श्रेया भाटकर आणि सचिन अपकारे या लाभार्थ्यांचा समावेश होता.
वाहनाची चावी आणि मंजुरीचे पत्र देऊन पालकमंत्री सामंत यांनी आणि किरण सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच एन आंधळे, विदर्भ कोकण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक सूर्यकांत साठे, माजी जिल्हापरिषद सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, राजन शेट्ये आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा