नांदेड : लोकसभेची आचारसंहिता लागू असताना नांदेड पोलिसांनी दोन दुकानांवर छापे घालून अवैधरित्या विकल्या जाणार्या धारदार शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.
यामध्ये एका दुकानातून ३६ तलवारी ८५ खंजीर आणि ८ गुप्त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर, दुसर्या दुकानातून १ तलवार १२ खंजीर आणि १२ चाकू जप्त करण्यात आले आहेत.
नांदेडमधील वजिराबाद पोलीसठाण्याचे निरीक्षक राजू वाटाणे हे आपल्या पथकासह शस्त्रविक्री होत असलेली दुकाने असलेल्या भागात गेले असता त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी संतोष आबाराव शिरफुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३६ तलवारी ८५ खंजीर आणि ८ गुप्त्या जप्त केल्या. तर, अन्य एका दुकानावर छापा घालून तेथून १ तलवार १२ खंजीर आणि १२ चाकू जप्त केले.
या प्रकरणी वजिराबाद पोलीसठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर नांदेड पोलीस सावध झाले असून शहरात येणार्या आणि शहराबाहेर जाणार्या वाहनांची नाकाबंदी करून तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
Reviewed by ANN news network
on
३/२२/२०२४ ०१:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: