राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात ९४१ जणांना मिळाली तात्काळ नोकरीची ऑफर

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील युवक राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ९४१ जणांना तात्काळ 'ऑफर लेटर' देण्यात आले. सुमारे ४ हजार जणांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. २ हजार ८०० हून अधिक तरुणांनी ऑनलाईन मुलाखतीसाठी नोंदणी केली. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या वतीने आणि युवकचे शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


या मेळाव्याचे उदघाटन युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, निलेश पांढारकर, राजू लोखंडे आणि  माजी नगरसेविका माया बारणे, चंदा लोखंडे, सुमन पवळे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, महिला निरीक्षक शितल हगवणे,  युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, माजी सैनिक सेल अध्यक्ष बाबाजी खामकर, महिला संघटक पुष्पा शेळके, पिंपरी विधानसभा संघटक नारायण बहिरवाडे, बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोपणे, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष गंगा धेंडे, वर्षा शेडगे, आशा शिंदे, साफसफाई कामगार महिला अध्यक्ष सुवर्णा निकम, वंदना कांबळे,मेधा पळशीकर, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हणे, प्रसन्ना डांगे, प्रसाद कोलते, युवक प्रवक्ते चेतन फेंगसे, मुख्य समन्वयक युवक प्रशांत सपकाळ  पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माचरे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष प्रतीक साळुंखे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, रामकृष्ण मोरे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य लोबो सर, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटचे फाउंडर रमणप्रीत सिंग, धनाजी तांबे, सुनील आडागळे आदी उपस्थित होते.


कंपनी व्यवस्थापनांकडून ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी काळात होणार आहेत. विशेष म्हणजे काही उमेदवारांना तीन-तीन ऑफर मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात ९४१ जणांना मिळाली तात्काळ नोकरीची ऑफर राष्ट्रवादीच्या रोजगार मेळाव्यात ९४१ जणांना मिळाली तात्काळ नोकरीची ऑफर Reviewed by ANN news network on ३/१७/२०२४ ०२:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".