मुंबई : मुंबईतील सहार वाहतूक विभागात काम करणार्या एका पोलीस उपनिरीक्षकाला दोन हजार रुपयांची लाच घेताना अँटीकरप्शनच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
अँटीकरप्शनचे मुंबई विभागातील सहायक आयुक्त (प्रशासन) नितीन दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार
फ्रान्सिस रॉकी रेगो, उपनिरीक्षक, सहार वाहतूक विभाग, अंधेरी पूर्व, मुंबई असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी एका टॅक्सीमालकाने अँटीकरप्शनच्या वरळीतील कार्यालयात तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या दोन गाड्या असून त्यातील एक तो स्वतः चालवतो. तर, दुसर्या गाडीवर ड्रायव्हर ठेवला आहे. १४ मार्च रोजी ड्रायव्हरचा तक्रारदाराला कॉल आला. बिस्लेरी जंक्शन, अंधेरी पूर्व येथे सहार वाहतूक पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. कारवर १७ हजार रुपये दंड प्रलंबित असून कार सोडण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागण्यात आली आहे असे त्याने तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराने अँटीकरप्शनकडे अर्ज दिला. त्यानंतर सापळा रचला. त्यावेळी दोन हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक रेगो यांना 'रंगेहाथ' पकडण्यात आले.
ही कामगिरी अँटीकरप्शनचे अपर आयुक्त विजय पाटील, राजेंद्र सांगळे, भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटीकरप्शनच्या मुंबई विभागातील कर्मचार्यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ ०१:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: