दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे उदघाटन
पुणे : ' ग्रामीण - शहरी गरजांची सांगड घातली ,कल्पकतेने पर्यटकांपर्यंत पोहोचले तर निसर्ग ,शेती ,मोकळ्या हवेची ओढ ,पर्यटन केंद्रातील आधुनिक सोयी पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे खेचून आणतील ' असा सूर दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात शनिवारी उमटला .
' ऍग्रो टुरिझम विश्व' आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा दिनांक १६ आणि १७ मार्च या पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर (पुणे) येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन १६ रोजी सकाळी झाले.कृषी पर्यटन कार्यशाळेमध्ये विदर्भ,कोकण,पश् चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र विभागातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला .
पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव,पराशर कृषी पर्यटन केंद्र चे संस्थापक मनोज हाडवळे, कर सल्लागार अमोल वायभट,मनोज हाडवळे, नम्रता हाडवळे, ' ऍग्रो टुरिझम विश्व' चे संस्थापक गणेश चप्पलवार,मयूर घंगाळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.पर्यटनातील विविध टप्प्यांविषयी मनोज हाडवळे यांनी मार्गदर्शन केले.आलेल्या पर्यटकांना विविध उपक्रम, ऍक्टिव्हिटी संदर्भात नम्रता हाडवळे यांनी मार्गदर्शन केले.बसवंत विठाबाई बाबाराव यांनी कृषी पर्यटनात पर्यावरणाचे महत्त्व आणि झाडांचे महत्त्व याविषयी माहिती दिली.मयूर घंगाळे यांनी पाहुणचार हॉस्पिटलिटी आणि जेवण या विषयी पर्यटकांची आवड ओढ याविषयी मार्गदर्शन केले.अमोल वायभट यांनी कॅपिटल कृषी पर्यटनाच्या आर्थिक व कायदेशीर बाबींविषयी सखोल मार्गदर्शन केले.१७ मार्च रोजी बसवंत विठाबाई बाबाराव, अमोल वायभट आणि गणेश चप्पलवार मार्गदर्शन करणार आहेत.
हाडवळे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजनांची माहिती दिली. कृषी पर्यटन संबंधी भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले . कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अडचण आल्यास संपर्क करा असे आवाहन केले .कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकरी वर्ग यांच्या कृषी पर्यटनासाठी मिळणार असणारा पतपुरवठा यांमध्ये विविध बँकिंग योजना पर्यटन कर्ज मुद्रा योजना यांचे मार्गदर्शन केले . शेतकऱ्यांच्या शकांचे निरसन केले. कृषी पर्यटनातीत इतर जोडव्यवसाय करू शकतो ,शहरातील पैसा ग्राणीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो,कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्यां प्रामाणात कशा उपलब्ध होत आहेत ,याविषयी मार्गदर्शन केले .
कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून असलेली संधी,व्याप्ती,नव माध्यमे, डिजिटल तसेच समाज माध्यम किती महत्वाचे आहेत, मार्केटिंग व जाहिरात तंत्र , सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाईटचे फायदे, किवर्ड आणि कंन्टेन्टचा वापर करून आपली वेबसाईट गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास आणू शकतो या विषयी ' अॅग्रो टूरिझम विश्व 'चे संचालक गणेश चप्पलवार यांनी मार्गदर्शन केले. कृषी पर्यटनाची भविष्य, संधी, सध्यस्थिती, कृषी पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन केले.
कृषी पर्यटनाला आहे यशस्वी वर्तमान आणि उज्वल भविष्यही ! : कार्यशाळेतील सूर
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ ११:४२:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ ११:४२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: