मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलबाजावणी, गुन्हेशाखेने अंधेरीतील एका अनधिकृत डान्सबारवर ५ मार्च रोजी छापा घातला. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ७७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बारचा मॅनेजर, कॅशियर, वेटर यांचा समावेश आहे.
'श्रीरामभवन रेस्टॉरन्ट ॲन्ड बार', श्रीराम हाऊस, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), असे छापा घालण्यात आलेल्या बारचे नाव आहे.
गिरीश हुआप्पा गौडा वय ४३वर्षे धंदा-मॅनेजर,प्रमोद कुमार जनार्दन शेट्टी वय ४४वर्षे धंदा - कॅशियर,अजमल सरवर अली वय ३३वर्षे धंदा-लॅपटॉप हाताळणारा,सोनू प्रकाश नारायण दुबे वय २६वर्षे धंदा-स्टिवर्ड,केशव कमलाक्ष शेट्टी वय ५४ वर्षे धंदा-स्टिवर्ड,अरविंद जाडो सिंग वय ४०वर्षे धंदा- वेटर,विनोद सुदर्शन यादव वय ३८वर्षे धंदा- वेटर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय तेथे नृत्य करणार्या ५ महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्यावर अंधेरी पोलीसठाण्यात १२६/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम १८८, ३४ सह महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मदयपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणा-या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६ च्या कलम ३, ८ (१) (२) (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामभवन रेस्टॉरन्ट ॲन्ड बारमध्ये बेकायदेशीरपणे महिलांचे नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या अंमलबाजावणी, गुन्हेशाखेने तेथे छापा घातला. आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत रोख २७ हजार ४०० रुपये, १ लॅपटॉप, १ अॅम्प्लीफायर, १ स्पीकर, मेमरी कार्ड असा सुमारे ७७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मीना, उपायुक्त (अंमलबजावणी) श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पोतदार, सहायक निरीक्षक बाळासाहेब कानवडे, उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, अंमलदार हळर्णकर, पाटसुपे,यादव,पाटील व गुन्हे शाखा येथील जाधव तसेच अंधेरी पोलीसठाण्याचे उपनिरीक्षक गणेश जाधव, अंमलदार सुर्यवंशी, जाधव यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/०६/२०२४ ०८:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: