देहुरोड येथील प्रकार
पिंपरी : देहुरोड येथे ५ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका २४ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे वडील शिवसेना (उबाठा) गटाचे विभागप्रमुख आहेत.
विशाल विजय थोरी वय - २४ वर्षे रा. संगिता अपार्टमेंट फ्लॅट नं. ०३ विकासनगर गणपतीमंदीराजवळ देहुरोड ता. हवेली जि.पुणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे,त्याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने दगड, लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा त्याचा मृत्यू झाला.
विशाल याचे वडील विजय जोरी हे शिवसेना ठाकरे गटाचे देहुरोड विभागप्रमुख आहेत.
रोहन राजेश देशमुख वय.२३ वर्षे, रा. विकासनगर, देहुरोड, पुणे, सुयश विलास देशमुख वय.२६ वर्षे, रा. विकासनगर, देहुरोड, पुणे, अमित कैलास वरगडे वय. २४ वर्षे, रा. स्वराजनगरी, तळेगाव चाकण रोड, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, वैभव शिवाप्पा ओनी वय. २० वर्षे, रा. स्वराजनगरी, तळेगाव चाकण रोड, तळेगाव दाभाडे,ता. मावळ, जि. पुणे व त्याचे साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार विकासनगर, किवळे परिसरात श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळ घडला असून काही मृत विशाल याच्यावर तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्याला काही कळण्याच्या आत दगड, सिमेंट ब्लॉक्स, काठ्या यांनी हल्ला चढविला. त्याच्या डोक्यात आणि तोंडावर फुलझाडांच्या कुंड्या फेकून मारण्यात आल्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडळ – २ बापू बांगर , सहाय्यक आयुक्त, देहुरोड विभाग श्री. घेवारे, वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आशिष जाधव, अंमलदार प्रशांत पवार, बाबा क्षीरसागर, बाळासाहेब विधाते, सुनिल यादव, विजय गेंगजे किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, निलेश जाधव यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/०६/२०२४ ०८:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: