मुंबई : मुंबईतील गोरेगाव, पूर्व परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १२ च्या पथकाने ३ मार्च रोजी पहाटे एक महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४२ लाख रुपये किमतीचे २८५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले.
एच वॉर्ड ४७, बी.एम.सी. कॉलनी, संतोषनगर, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गोरेगाव पूर्व येथे असलेल्या सार्वजनिक शौचालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली.
मोहम्मद हनिफ रफिक खान, वय ४८ वर्षे व एक ३९ वर्षे वयाची महिला यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना पाहताच हे दोघे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपींवर दिंडोशी पोलीसठाण्यात १९५/२०२४ क्रमांकाने विशेष स्थानिक गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांच्यावर एन. डी. पी. एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने त्यांना ७ मार्च पर्यंत पोलीसकोठडी दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त, देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे), शशिकुमार मिना, उपआयुक्त (प्रकटीकरण- १), विशाल ठाकुर, सहाय्यक आयुक्त ( प्र - उत्तर ), काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक नवनाथ जगताप, सहायक निरीक्षक सावंत,रासकर,हवालदार लक्ष्मण बागवे, सुनिल चव्हाण, शैलेश बिचकर, विशाल गोमे, प्रसाद गोरूले, महिला हवालदार कदम, महिला शिपाई खाडे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/०६/२०२४ ०८:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: