चाकण येथे मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्या उपस्थितीत युतीची समन्वय बैठक

 


पुणे :  शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक १ एप्रिल रोजी चाकण येथे होणार आहे. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२ वाजता पुणे नाशिक मार्गावर एकतानगर, चाकण येथे प्रोटेक्ट कंपनी समोर असलेल्या हॉटेल आरती एक्झिक्युटीव्हमध्ये ही बैठक होणार आहे.

बैठकीत विजयाच्या संकल्पासह प्रचाराचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी दिली.

या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, उपनेते इरफान सय्यद,उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, राहुल कुल,अतुल बेनके, चेतन तुपे, माजी आमदार शरद सोनावणे, योगेश टिळेकर, विलास लांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपा पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर,आर. पी. आय. (आठवले गट) जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार,आर. पी. आय. (खरात गट) प्रदेशाध्यक्ष सचिन खरात, रासपचे शिवाजी कुऱ्हाडे, शिवसंग्रामचे संदेश बारवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (जोगेंद्र कवाडे गटाचे) प्रकाश भालेराव, लोकजनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट, जनता दल सेक्युलरचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे तसेच प्रहार संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना, लहुजी सेना, लहुजी शक्ती सेना ह्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.


चाकण येथे मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्या उपस्थितीत युतीची समन्वय बैठक चाकण येथे मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्या उपस्थितीत युतीची समन्वय बैठक Reviewed by ANN news network on ३/३१/२०२४ ०८:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".