३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्यास तयार : हेमंत पाटील
पुणे : इंडिया अगेंस्ट करपशन या संघटनेच्या पुढाकाराने देशातील नोंदणीकृत ५० राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनविकास आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवणार असून आज ३२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तसेच मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरायचे असेल तर आम्ही उमेदवारी देणार असल्याचेही आघाडीचे नेते हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी पुण्यात ' महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील ' भारतीय जनविकास आघाडी 'चे पुरस्कृत संभाव्य उमेदवारांची कार्यशाळा आयजित करण्यात आली होती, त्या नंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आघाडीचे प्रमुख भाऊसाहेब बावने , राजेंद्र वनारसे, शिवाजीराव म्हस्के, अशोक जाधव धनगावकर, रेणुका पानगावकर, प्रा. रेखा पाटील, सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
जरांगे पाटील यांना पाठिंबा, उमेदवारी देणार तसेच छगन भुजबळ ओबीसी साठी लढण्यास तयार असतील तर त्यांनाही मदत करणार असल्याचे सांगत हेमंत पाटील म्हणाले, प्रस्थापित राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत यामुळे जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून आम्ही जात आहोत. आम्ही कोणत्याही आजी - माजी आमदार, खासदार किँवा मंत्री यांना उमेदवारी देणार नाही. सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न, शेतकऱ्यांना मोफत वीज, बेरोजगारी कमी करणे आणि पायाभूत सुविधांची निर्मिती हे आमचे ध्येय आहे.
आमच्या आघाडीतील सर्व घटक पक्ष हे राज्यभर पसरलेले आहेत ज्यांची जिथे जास्त ताकद त्या पक्षाला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. उर्वरित १६ उमेदवार येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.
भाऊसाहेब बावने म्हणाले, राज्यात तिसरी आघाडी म्हणून भारतीय जनविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. तसेच ही आघाडी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लढणार आहे.
राजेंद्र वनारसे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत.
'भारतीय जनविकास आघाडी ' राज्यातील सर्व लोकसभा जागा लढवणार
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०७:३७:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०७:३७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: