खुनाच्या गुन्ह्यातील 'वॉन्टेड' बोगस डॉक्टर आणि त्याची डॉक्टर पत्नी अटकेत

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष १२ च्या पथकाने मालवणी, मालाड परिसरातून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला एक बोगस डॉक्टर आणि त्याला दवाखाना चालविण्यासाठी देणारी त्याची पत्नी या दोघांना अटक केली आहे. या दोघांवर मालवणी आणि कापूरबावडी पोलीसठाण्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

परवेज अब्दुल अजिज शेख, वय ४६ वर्षे असे या आरोपीचे नाव असून त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

मुलुंड पोलीसठाण्यात २९८/२०२३ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ११२, ११७, १२०(ब), ३०२, ३०७, ४१६, ४१९, ४६५, ४२६, ४७१, ३४ भादवि सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अॅक्ट १९६१ कलम ३३, ३३ (अ), ३४, ३६ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा कक्ष १२ चे पथक करत होते. यातील आरोपी मालवणी परिसरात अजिज पॉलिक्लिनिक नावाने हॉस्पिटल चालवित असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने मुंबई महापालिकेच्या पी/नॉर्थ विभागाच्या सहायक वैद्यकीय अधिकार्‍याला सोबत घेऊन तेथे छापा टाकला. त्यावेळी आरोपी परवेज हा त्याचे कोणतेही वैद्यकीय शिक्षण झालेले नसताना आणि प्रॅक्टिस करण्यासाठी परवाना नसताना रुग्णांवर उपचार करताना आढळून आला.त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पत्नी बीयूएमएस डॉक्टर असून तिने पतीला दवाखाना चालविण्यास दिला. या दवाखान्यात तिलाही वापरण्यास परवानगी नसलेली औषधे आढळली म्हणून त्यांच्याविरूद्ध मालवणी पोलीसठाण्यात ४३१/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४१९, ४२०, ३४ सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अॅक्ट १९६१ कलम ३३, ३३(अ), ३३(ब), ३५ (२), ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पुढील कारवाईकरिता मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दोन्ही आरोपींवर मालवणी आणि कापूरबावडी पोलीसठाण्यात भारतीय दंडविधान आणि महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक कायद्याखाली या आधीच गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे),शशीकुमार मिना, उप आयुक्त (प्रकटीकरण १) विशाल ठाकुर,सहाय्यक आयुक्त (डी-उत्तर) काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष - १२ चे प्रभारी निरीक्षक नवनाथ जगताप, निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहायक निरीक्षक विजय रासकर,विशाल मोहिते, उपनिरीक्षक निलोफर शेख, हवालदार शैलेश बिचकर, विशाल गोमे,प्रसाद गोरूले, शैलेश सोनावणे, शिपाई चंद्रकांत शिरसाठ व सहायक फौजदार चालक कैलास सावंत यांनी केली.


खुनाच्या गुन्ह्यातील 'वॉन्टेड' बोगस डॉक्टर आणि त्याची डॉक्टर पत्नी अटकेत  खुनाच्या गुन्ह्यातील 'वॉन्टेड' बोगस डॉक्टर आणि त्याची डॉक्टर पत्नी अटकेत Reviewed by ANN news network on ३/२९/२०२४ ०८:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".