मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये मावळसाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून आता शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना (उबाठा)चे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होणार असे चित्र या घडीला निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही यादी जाहीर केली आहे. त्यानुसार
१ ३० - मुंबई दक्षिण मध्य श्री राहुल शेवाळे २ ४७ - कोल्हापूर श्री संजय मंडलीक ३ ३८ - शिर्डी (अजा) श्री सदाशिव लोखंडे ४ ५- बुलढाणा श्री प्रतापराव जाधव ५ १५ - हिंगोली श्री हेमंत पाटील ६ ३३ - मावळ श्री श्रीरंग बारणे ७ ९ - रामटेक (अजा)श्री राजू पारवे ८ ४८ - हातकणंगले श्री धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: