खेड : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्ताने खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शोषखड्डा निर्मिती उपक्रम राबविण्यात आले .
तालुक्यातील भरणे, भडगाव, वेरळ, कळंबनी, शेरवली या गावांमध्ये शोषखड्डा निर्मिती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. घराच्या स्वयंपाकगृह व न्हाणीगृहातून वाया जाणारे सांडपाणी जमिनीमध्ये झिरपावे तसेच सांडपाण्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून सांडपाण्याचे नियोजन करून जमिनीमध्ये झिरपावे यासाठी शोषखड्डा निर्मितीचे उपक्रम राबविण्यात आले. वेरळ, भरणे, भडगाव, कळंबणी, शेरवली या गावातील वाडी वस्तीवर शोषखड्डा निर्मिती राबविण्यात येऊन, शोषखड्ड्याचे महत्व व निर्मिती करण्याची पद्धत याबाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात खेड तालुक्यातील १०० श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठांनच्या वतीने खेड तालुक्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
Reviewed by ANN news network
on
३/०५/२०२४ ०८:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: