संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे : पत्रकार व कार्यकर्त्यांवरील हल्ले रोखावेत आणि अशा घटनांमधील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना सोमवारी दुपारी निवेदन देण्यात आले.
संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल ,संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे, पदाधिकारी स्वाती गायकवाड , अर्चना केदारी, पुणे शहराध्यक्ष सागर आढागळे, पुणे शहर उपाध्यक्ष आनंद आल्हाट, महिला कार्यकर्त्या शिल्पा महेंद्र बागडे, पुनम बंड, संजना पवार ,अश्विनी शिंगाडे ,स्वाती पुणेकर , संविधान ग्रुपचे डॉक्टर सेलचे प्रमुख संग्राम साळवे , भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश गंगे उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
२/१२/२०२४ ०९:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: