पिंपरी : भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या पर्वास पिंपरी चिंचवड शहरात सुरूवात करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३९ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी विविध महत्वाकांक्षी योजनांचा लाभ या माध्यमातून घेतला असून त्यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता.
आता दुसऱ्या टप्प्यात सदर वाहन यात्रा महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ४२ ठिकाणी काढण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ८ प्रभागांमधील विविध ४२ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन भेट देणार आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये २ ठिकाणी या वाहनासह नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या वाहनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शहरवासियांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
या यात्रेमध्ये आधार केंद्र, आत्मनिर्भर स्वनिधी योजना, आयुष्मान कार्ड, महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर योजनांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त आधार केंद्र कक्षाद्वारे नवीन आधार नोंदणी, नाव पत्त्यामध्ये दुरूस्ती, आधार लिंकींग, आयुष्मान कार्ड, आरोग्य विभागामार्फत माहिती आणि वैद्यकीय विभागातर्फे आजारांची तपासणी, तज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध सुविधाही विकसित भारत संकल्प यात्रा वाहनामार्फत नागरिकांना पुरविण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: