कंपन्यांमधील अनुभवींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे : शेखर सिंह

 


पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून महापालिका विविध उपक्रम किंवा विकासकामांचे नियोजन आखत असते. या विकासकामांसाठी विविध अनुभवी तज्ञांचीअत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. शहराची व्यापकता आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सी.एस.आर उपक्रमातंर्गत अधिकाधिक कंपन्यांमधील अनुभवी प्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे आहेअसे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर कक्ष अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४० कंपन्या तसेच विविध उद्योग समुह यांच्याद्वारे जास्तीत जास्त सी.एस.आर अंतर्गत सामाजिक उपक्रम करून त्याचा वापर समाजकल्याणासाठी करता यावा यासाठी डबल ट्री हॉटेलचिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलविजयकुमार खोराटेसह आयुक्त चंद्रकांत इंदलकरमुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसलेउप आयुक्त अजय चारठाणकर,  संदीप खोतरविकिरण घोडकेआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणेअतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवारमुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा मुख्य सी.एस.आर सेल प्रमुख निळकंठ पोमणसहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरातमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच  विविध ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सी.एस.आर सेलचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणालेशहराला पायाभूत सुविधा पुरविताना शैक्षणिकवैद्यकीयआरोग्य तसेच पर्यावरणावर लक्ष केंद्रित करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यासाठी महापालिकेने विविध उपक्रम तसेच  प्रकल्प राबविले आहेत. त्यातील काही प्रकल्पांमध्ये किंवा विकासकामांमध्ये सी.एस.आर निधीचा महत्वाचा वाटा आहे. सी.एस.आर निधीसोबत महापालिकेस शहरातील विविध कंपन्यांच्या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शहरातील दिव्यांग बांधवांसाठी सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुविधा असलेले पिंपरी चिंचवडमधील दिव्यांग कल्याणकारी केंद्र कदाचित देशातील एकमेव केंद्र असेल. या केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधा तसेच उपचार थेरपीसाठीची अत्याधुनिक उत्तम दर्जाची उपकरणे खरेदी करण्यामध्ये सी.एस.आर चा मोठा वाटा आहे. भविष्यात महापालिकेच्या वतीने विविध कल्याणकारी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील विविध कंपन्यांमधील प्रतिनिधींच्या अनुभवाची गरज असल्याचेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केलेमनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात येत आहे आणि या बैठकीस शहरातील विविध राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींचा प्रतिसाद लाभत आहे. सध्या शहरातील नागरिकांच्या गरजा वाढत आहेत आणि या गरजा पुर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्पउपक्रम राबविले जात आहेत. या विकासकामांमध्ये नाविन्यपुर्ण कल्पनाअत्याधुनिक यंत्रणा तसेच अनुभवाची गरज असते. शहरातील कंपन्यांकडे तो अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या मदतीने शहरात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडविण्यास मदत मिळू शकते. महापालिका शाळांमध्येरुग्णालयांमध्ये तसेच शहरातील विविध भागांमध्ये सी.एस.आर उपक्रमांच्या माध्यमातून अनेक बदल घडविण्यात आले आहेत. या बदलांमुळे नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत असून त्यांच्याकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद ही त्याची पोचपावती आहे.

सदर कार्यक्रमात कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी येत्या काळात सी.एस.आर मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाअंतर्गत कशा पद्धतीने योगदान केले जाऊ शकते याबाबत सखोल चर्चा केली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सी.एस.आर अंतर्गत सामाजिक उपक्रम राबविण्याची तयारी दाखविली.

यावेळी सी.एस.आर सेलच्या सल्लागार श्रुतिका मुंगी यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेस जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या सन्मानांची तसेच सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. उपस्थितांचे आभार मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा  सी.एस.आर प्रमुख निळकंठ पोमण यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋतुजा करकरे यांनी केले.

कंपन्यांमधील अनुभवींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे : शेखर सिंह कंपन्यांमधील अनुभवींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे : शेखर सिंह Reviewed by ANN news network on २/१७/२०२४ ०८:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".