पुणे: गेली ७ वर्षांपासून सौ. मृणाली रासने व श्री. हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघात आयोजित करण्यात येणारा "सन्मान स्त्री शक्तीचा" पुरस्कार तसेच भव्य तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. बाजीराव रोडवरील नातूबाग मैदानावर आयोजित सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक संगीता बर्वे तसेच परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त श्री. संदीपसिंह गिल हे उपस्थित होते. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या 21 रणरागिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी कसबा मतदारसंघातील १५ हजारांच्यावर महिलांनी उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना श्री. हेमंत रासने म्हणाले की, अनादी काळापासून ते आजच्या डिजिटल युगामध्ये स्त्रिया या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, आई, बहीण, पत्नी या विविध रूपांमध्ये ती आपल्याला कायम शक्ती बनून प्रेरणा देते. केवळ घरामध्ये न राहता आपल्या कार्याने स्त्रिया आज विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. गेली सात वर्षांपासून अशाच स्त्रीशक्तीचा सन्मान आपल्या माध्यमातून केला जात असून यंदा २१ रणरागिनींचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे.
प्रमुख पाहुणे श्री. संदीपसिंह गिल म्हणाले, "हेमंत रासने यांनी एवढा छान कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. स्त्रिशक्ती आज पुरुषांच्या देखील पुढे जाताना दिसत आहेत. खेळ, सामाजिक तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रात आपला ठसा स्त्रिया उमटावत आहेत. देशाच्या उन्नतीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. आपण सर्वानी आपल्या सोबत इतरांना देखील सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्व सक्षम झालो तर निश्चितच देश देखील सक्षम होऊ शकतो."
"आज विविध क्षेत्रतातील इतक्या माझ्या मैत्रिणींना सन्मानित करण्यात आले याचा मला आनंद आहे. प्रत्येकजण मनापासून काही ना काही काम करत असतो. प्रत्येक स्त्री ला आता आत्मभान आले आहे. यातूनच आपण आज आपण कर्तृत्व गाजवत आहोत. आपली दखल घेणारे हेमंतदादा रासने सारखे नेते आहेत याचा आनंद आहे" अशी भावना यावेळी संगीता बर्वे यांनी व्यक्त केली.
यावेळी कसबा विधानसभा अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, मतदारसंघाचे पालक संजय मामा देशमुख, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, योगेश समेळ, अर्चना पाटील, गायत्री खडके, मनिषा लडकत, मनीष साळुंखे, पदाधिकारी अश्विनी पवार, वैशाली नाईक, प्रणव गंजीवाले, निलेश कदम, अनिल बेलकर, पुष्कर तुळजापूरकर, सुनील रसाळ, अमित कंक, निर्मल हरिहर, राजू परदेशी, सिद्धेश पांडे, सनी पवार, तेजस गडाळे, फरहान शेख, महादेव साळुंखे, संकेत थोपटे, नितीन पंडित, पियूष शहा,मदिना तांबोळी, सुरेखा पाषाणकर, शबाना देशपांडे, मंजू शर्मा, शैलजा पाठक, तनुजा नाईक, अनघा दिवाणजी, कल्याणी नाईक, राधिनी खडके, आशा शिंदे यांच्यासह मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली गोडबोले यांनी केले.
सन्मान स्त्री शक्तीचा या पुरस्कार सोहळ्यात स्वाती नगरकर, पदमा डाखवे, सुनिता पाटसकर, शिल्पा सबनीस, मधुरा बेलके, कल्याणी कदम, वंदना पासकंठी, रश्मी करपे, डॉ पूजा देखणे, स्वाती ओतारी, राणी काची, मंजिरी धामणकर, विद्या कर्वे-सिरस, सायली गुजर-जोशी, पन्ना गुरु, स्नेहल शिंदे, जिज्ञा ठक्कर नेहा सट्टे, प्रज्ञाकेळकर, देवता देशमुख, बेनझीर पाटील, अलका गुंजाळ, सई परांजपे यांना गौरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: