बाबू डिसोजा कुमठेकर
पणजी, गोवा : गोव्यातील प्रख्यात साहिल प्रकाशन गोवातर्फे आयोजित खुल्या प्रवासवर्णन स्पर्धेत सौ. सविता रा. पाटील (सोलापूर) यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्रा. बी. एन. चौधरी (जळगाव) व श्री. एकनाथ वि. देशपांडे (पुणे) यांना अनुक्रमे व्दितीय व तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
श्री. शिवाजी घोरपडे (टिटवाळा, ठाणे), उर्मिला बळीराम गवस (म्हापसा गोवा), सौ. शितल संजय पाटील (साखळी गोवा), ॲड. विनिता झाडे मोहळकर (गंगाखेड, परभणी) , श्री. काशिनाथ भारंबे निर्मोही(भुसावळ), मेघा अशोक चेटूले (भंडारा),डॉ. नितीन बळवल्ली (नवी मुंबई),सौ. राधिका कुलकर्णी (फोंडा, गोवा),श्रीमती रजनी भारतीय (इन्दोर मध्यप्रदेश), सौ. राधा गोपी गाड (फोंडा, गोवा.), संतोष म. खरटमोल (कुर्ला, मुंबई), प्रवस्ती रोहिदास कुडव (पर्रा, बार्देश गोवा.), विलास पंढरी (वारजे, पुणे), सौ. सुवर्णा लक्ष्मण पाटील (बेळगाव), अरुणा शरद चव्हाण पाटील (सांगली), सौ. श्रृती सागर हजारे (फोंडा, गोवा.), सौ. ज्योती भूषण जोशी (वास्को, गोवा.),सौ. क्षितिजा कुलकर्णी (कोल्हापूर), सुुजाता जयंत पटवर्धन (सांगली), सौ. स्वाती अरविेद केंजळे (बारामती, पुणे), मधुकर केळकर (वाळपई, गोवा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री. नारायण बा. धारगळकर व प्रा. एस. डी. राजाध्यक्ष यांनी काम पाहिले.
साहिल प्रकाशनाच्या प्रवासवर्णन स्पर्धेचा निकाल जाहीर; सविता पाटील प्रथम
Reviewed by ANN news network
on
२/१७/२०२४ ०८:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: