पोलीस उपनिरीक्षकासाठी लाच स्वीकारणारा अटकेत

 


पुणे : भारती विद्यापीठ पोलीसठाण्याच्या सायबर युनिटकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि प्रकरण मिटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाला देण्याकरिता १ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये रोख स्वीकारताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने एका व्यक्तीस २१ फेब्रुवारी रोजी कात्रज परिसरात अटक केली.

तुषार शितल बनकर, वय ३० वर्ष, व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट, रा. आंबेगाव पठार, पुणे असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका ४२ वर्षांच्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.

तक्रार देणार्‍या व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, सायबर युनिट येथे फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल होता. त्या प्रकरणात चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटविण्यासाठी तुषार बनकर ह्याने उपनिरीक्षक संजय नरळे करिता १ लाख रुपयांची लाच मागितली अशी तक्रार त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती. या प्रकरणी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा लावला. आणि; दि. २१ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर, सुखसागरनगर चौकीसमोर, सुखसागरनगर, कात्रज, पुणे येथे तुषार बनकर याला २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपरअधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

पोलीस उपनिरीक्षकासाठी लाच स्वीकारणारा अटकेत पोलीस उपनिरीक्षकासाठी लाच स्वीकारणारा अटकेत Reviewed by ANN news network on २/२३/२०२४ ०५:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".