विठ्ठल ममताबादे
उरण : माजी आमदार मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेच्या हिंदुरक्षक मित्र मंडळ, नवीन शेवा यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे माघी श्री गणेश जयंती निमित्त नवीन शेव्यातील श्री राम मंदिरात श्रीगणेशाचा महाभिषेक व श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री गणेशाला कर्नाटक येथे बनवून आलेल्या रथाची कायमस्वरूपी सजावट करण्यात आली, या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर वेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, माझ्या विचारांच्या आधारावर आपल्या मंडळातर्फे सामाजिक व शैक्षणिक काम करत आहात, त्याचे मनापासून समाधान आहे व हे कार्य अखंडपणे चालू राहिले पाहिजे, तसेच आपल्या गावाच्या सार्वजनिक व सामाजिक कार्यात आपल्या मंडळाने विविध अशी विकास कामे केली याचा मला खरोखर अभिमान वाटतो. उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. तर हिंदू रक्षक मित्र मंडळाचे सदस्य दीपक भोईर यांची शिवसेना उरण तालुका संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या मयुरी घरत, पलस्पे कार्यकर्ते विक्रम घरत उपस्थित होते.यावेळी महिलांतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष दयाल भोईर,उपाध्यक्ष दिनेश घरत,सेक्रेटरी परशुराम ठाकूर, खजिनदार प्रकाश म्हात्रे, माजी अध्यक्ष पी डी घरत, गणेश घरत, जगजीवन भोईर, शेखर पडते, किसन म्हात्रे, पंकज सुतार, शैलेश भोईर, मोतीराम घरत, उदय दरने, केशव घरत, सतीश भोईर, तुकाराम भोईर, संदीप घरत, निवास पठारे, सुरेश ठाकूर, सज्जन ठाकूर, मनोज म्हात्रे, भुपेंद्र भोईर, कुंदन भोईर, जितेंद्र घरत, किरण राणे, महेंद्र भोईर , हरेश्वर भोईर, गणेश चौघुले, विनायक भोईर व जनार्दन भोईर यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमास ग्रामस्थ व हिंदुरक्षक मित्र मंडळ आपल्या कुटूंबियासह उपस्थित होते.
माजी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेतर्फे श्री गणेश जयंती उत्साहात साजरी
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०७:३६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०७:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: