वाकड पोलिसांनी मेडिकल स्टोअर्स मालकाला लुटणार्‍या टोळीला ठोकल्या बेड्या

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात मेडिकल स्टोअर्स चालकाला लुटणार्‍या एका टोळीला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. या टोळीत एक अल्पवयीन आहे.

व्यंकटेश ऊर्फ हर्षल परशुराम जाधव वय २० वर्षे रा. तायरा कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, आदेश परशुराम शिंदे, वय २२ वर्षे, रा. काटे कॉलनी, चर्‍होली फाटा, पुणे, गोविंद लालू रुपवते, वय १९ वर्षे, रा. सद्गुरुनगर, भोसरी, पुणे,सोन्या ऊर्फ ऋषीकेश नाना धोञे वय २१ वर्षे रा. दुर्गामाता नगर, चिंचवड स्टेशन, चिंचवड पुणे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष दिलीप शहा, वय ४४ वर्षे, रा. फिलीप्स सोसायटी, वानवडी, पुणे यांचे  चंदन फार्मासिस्ट नावाचे मेडिकल स्टोअर्स कलाटे गार्डन, वाकड येथे आहे.७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ते दुकान बंद करून घरी जाण्यासाठी मोटारसायकल जवळ आले असता त्यांना पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील दिवसभराची जमा झालेली ४५ हजार ५६० रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली होती.या प्रकरणी वाकड पोलिसठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून १३८ / २०२४ क्रमांकाने भा.दं.वि. कलम ३९५, आर्म अॅक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  वाकड पोलिसांचे पथक या प्रकरणाचा शोध करत होते.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. लुटारूंनी मास्क घातले असल्याचे त्यांना दिसून आले. असल्यामुळे त्यांची लुटारूंची ओळख पटणे कठीण जात होते. मात्र, ते बराच वेळ या परिसरात फिरत असल्याचे फुटेजवरून दिसून आल्याने हा गुन्हा त्यांनी पूर्वी माहिती काढून केला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यावरून तपास करण्यास सुरुवात केली.आणि आरोपींपैकी अल्पवयीनासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी प्रतिक दौंडकर हा आमच्या ओळखीचा तरुण शहा यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्याकडून आम्ही ते पैसे कधी घेऊन जातात याची माहिती काढून घेतली होती अशी कबुली दिली.त्याचबरोबर एक न्य साथीदार सोन्या धोत्रे याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी त्यालाही अटक केली.

ही कामगिरी  पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे,उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द् सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, हवालदार संदीप गवारी, वंदु गिरे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव,  प्रमोद कदम, दिपक साबळे, अतिक शेख, नाईक प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, शिपाई भास्कर भारती, अजय फल्ले, स्वप्निल लोखंडे, रमेश खेडकर,ज्ञानदेव झेंडे, सागर पंडीत यांनी केली.

वाकड पोलिसांनी मेडिकल स्टोअर्स मालकाला लुटणार्‍या टोळीला ठोकल्या बेड्या वाकड पोलिसांनी मेडिकल स्टोअर्स मालकाला लुटणार्‍या टोळीला ठोकल्या बेड्या Reviewed by ANN news network on २/१४/२०२४ ०७:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".