मुंबई : राज्यशासनाने आज १४ फ़ेब्रुवारी रोजी ५ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. तसे आदेश सायंकाळी उशिरा जारी करण्यात आले आहेत. बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
1. श्रीमती रुबल प्रखेर-अग्रवाल, IAS (2008) आयुक्त, एकात्मिक बाल विकास योजना, नवी मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, माविम, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री अस्तिक कुमार पांडे (IAS:MH:2011) जिल्हाधिकारी, छत्रपट्टी संभाजी नगर यांची अतिरिक्त सेटलमेंट कमिशनर आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री दिलीप स्वामी (IAS:MH:2011) यांची छत्रपट्टी संभाजी नगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्रीमती वसुमना पंत (IAS:MH:2017) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. श्री सुहास गाडे, IAS (2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ यांना प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०७:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: