मुंबईत २० फेब्रुवारी रोजी 'धन्यवाद देवेंद्रजी' चे आयोजन : प्रवीण दरेकर

 


मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई : मुंबईकरांचे गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भारतीय जनता पार्टीमुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने 20 फेब्रुवारी रोजी  ''धन्यवाद देवेंद्रजी'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  मुंबई बँकेचे अध्यक्ष व भाजपा आ. प्रवीण दरेकर यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ.दरेकर बोलत होते. आ.प्रसाद लाडभाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बनभाजपा प्रदेश प्रवक्ते आसिफ भामला आदी यावेळी उपस्थित होते. 20 फेब्रुवारी रोजी काळाचौकी अभ्युदय नगर येथील भगतसिंग मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.        

आ. दरेकर यांनी सांगितले की,लाखो मुंबईकरांचे गृहनिर्माण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी गोरेगाव येथे गृहनिर्माण संस्थांच्या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत करण्यात आलेल्या अनेक मागण्या मान्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. या परिषदेतील 16 विषयांबाबत राज्य शासनाने शासन निर्णयही जारी केले आहेत. अनेक वर्षांच्या मुंबईकरांच्या मागण्या मान्य करत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होणाऱ्या या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावेमुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढाशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलारमुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळेमाजी आमदार बाळा नांदगावकरहौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्वयं पुनर्विकासाची प्रकरणे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून राबविली जाणार आहेततसेच स्वयंपुनर्विकासाकरीत कर्जावर व्याज सवलत ही देण्यात येणार आहेतअशी माहितीही आ. दरेकर यांनी दिली.

मुंबईत २० फेब्रुवारी रोजी 'धन्यवाद देवेंद्रजी' चे आयोजन : प्रवीण दरेकर मुंबईत २० फेब्रुवारी रोजी 'धन्यवाद देवेंद्रजी' चे आयोजन : प्रवीण दरेकर Reviewed by ANN news network on २/१४/२०२४ ०८:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".