भाजपमध्ये गेलेले खानावलेचे सरपंच आणि कार्यकर्ते एका दिवसात परतले; माजी आमदार मनोहर भोईर यांची शिष्टाई
विठ्ठल ममताबादे
उरण : उरण विधानसभेतील पनवेल तालुक्यातील शिवसेनेच्या खानावले ग्रामपंचायत सरपंच जयश्री सुभाष नाईक यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी ११ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, एकाच दिवसात त्यांनी स्वगृही परतणे पसंत केले आहे.
त्यांनी १२ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
भोईर यांनी पुढाकार घेऊन त्यांची घरवापसी केली. त्यांचा करिष्मा पुन्हा एकदा सर्वांना पाहावयास मिळाला. मनोहरशेठ भोईर,पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून त्यांचे पुन्हा एकदा शिवसेनेत स्वागत केले.
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०८:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: