डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी कडून आयोजन
पुणे : डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी(आंबी ,पुणे ) च्या वतीने आयोजित 'होनहार भारत -लीडरशिप माईंडसेट ' या संकल्पनेवर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन 'क्विक हिल'कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर,इंटेलीमेन्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पानसरे,डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी च्या कुलगुरु डॉ.सायली गणकर यांच्या उपस्थितीत दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता आंबी शैक्षणिक संकुलात करण्यात आले .
ही तीन दिवसीय परिषद १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.शाश्वत आर्थिक प्रगती,सामाजिक विकास,पर्यावरण संवर्धन,सुशासन अशा विषयावरील मार्गदर्शन सत्रे,उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार असे या राष्ट्रीय परिषदेचे स्वरूप आहे.एकूण ४० वक्ते,१ हजार मान्यवर आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी आहेत.सर्व मार्गदर्शन सत्रे आंबी शैक्षणिक संकुलात होत आहेत.'होनहार भारत' राष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष आहे.
सौरभ शाह,अमित बिवलकर,डॉ.अमित आंद्रे,सौरभ भारद्वाज,सुशील मुंदडा,सुभाष तळेकर,आकाश मावळे,प्रवीण हलकीकर,तुषार कांबळे हे मान्यवर सहभागी झाले.डॉ.प्रणव रंजन,डॉ.रोहन दास यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.अनुप एस,प्रा.सायली कारांडे,प्रा.महेश खुडे यांनी आभार मानले.डॉ.सायली गणकर आणि कर्नल सुनील भोसले (निवृत्त)यांनी स्वागत केले.
कैलास काटकर म्हणाले,'विकसित भारत प्रत्यक्षात येत आहे.आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत.अशावेळी सायबर सिक्युरिटी कडे आपण लक्ष द्यायला हवे.सायबर हल्ल्याच्या आक्रमणाला सहन करता कामा नये'.प्रशांत पानसरे म्हणाले,'भारतात वेगवान माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल क्रांती होत असताना ग्राहकांकडे निर्णयक्षमता आणि ताकद येत आहे.डेटा आणि आर्टिफिशियल क्षेत्रातील सर्वांनी स्पर्धेवर मात करून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा दिली पाहिजे'.कुलगुरू डॉ.सायली गणकर म्हणाल्या,'होनहार भारत ही परिषद नेतृत्व विकसनासाठी आहे.सध्याच्या गतिमान युगात धेय्य उच्च दर्जाचे असेल तर तितकेच प्रभावी व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.त्यासाठी प्रशिक्षण आणि विचारांचे आदान प्रदान करायला हे योग्य व्यासपीठ आहे'.
९ फेब्रुवारी रोजी विविध मार्गदर्शन सत्रे होणार असून १० रोजी समारोप कार्यक्रमात बार्कलेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वूक्कलम,एक्सेंचर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कालगुडे उपस्थित राहणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
२/०८/२०२४ ०८:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: