पालघर : डहाणू भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखपाल व उप अधीक्षक यांना २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.यातील अभिलेखपाल पुण्यातील घोरपडी परिसरातील रहिवासी आहे.
एका ३६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पालघर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.अभिलेखापाल गोरख शंकर घुमरे (वय 39 सध्या रा. पारनाका, डहाणू गाव, कायमचा पत्ता गुलमोहर पार्क, बालाजी सुपर मार्केट जवळ, घोरपडी, पुणे मुळ रा. मु.पो. देवारवाडी ता.मालेगाव जि. नाशिक), उप अधीक्षक प्रफुल्ल लक्ष्मण संखे (वय 54 रा. मोरया नगर, विरार (पूर्व) ता.वसई जि. पालघर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदाराच्या मामेभावाच्या जमिनीची मोजणी डहाणू भूमी अभिलेख कार्यालयाने केली होती. त्या जमीनीची हद्द दाखवून नकाशा तयार करून देण्यासाठी अभिलेखापाल गोरख घुमरे याने ३० हजार रुपयांची लाच मागितली.या बाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकार्यांनी सापळा रचला. यावेळी गोरख घुमरे याने ५ हजार रुपये आणि उपअधीक्षक प्रफुल्ल संखे याने २५ हजार रुपये लाच म्हणून स्वीकारले. दोघांना तात्काळ पकडण्यात आले.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक सुनील लोखंडे, अपर अधीक्षक महेश तरडे, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दयानंद गावडे, निरीक्षक शिरीष चौधरी, अंमलदार संजय सुतार, नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोये, शिपाई चालक जितेंद्र गवळे, सखाराम दोडे यांच्या पथकाने केली.
Reviewed by ANN news network
on
२/२८/२०२४ ०३:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: