भारतीय नौदल आणि एनसीबी आणि गुजराथ एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत ३ हजार ८९ किलो अमलीपदार्थ जप्त; पाच पाकिस्तानी नागरिक अटकेत

मुंबई : भारतीय नौदल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजराथ एटीएस यांनी आज २८ फेब्रुवारी रोजी भारताच्या सागरीहद्दीत कारवाई करत एका नौकेवरून ३ हजार ८९ किलो अमलीपदार्थ जप्त केले.या प्रकरणी नौकेतील ५ कामगारांना ताब्यात घेण्यात आले असून ते पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. अलिकडच्या काळात हा सर्वात मोठा पकडण्यात आलेला अमलीपदार्थांचा साठा आहे.

या धाडीत ३ हजार ८९ किलो चरस, १५८ किलो मेथाम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिन जप्त करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. या अमली पदार्थाची किंमत अद्याप समजू शकलेली नाही परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात १ किलो चरसची किंमत ७ कोटी रुपये आहे.

केंद्रसरकारने ऑपरेशन समुद्रगुप्त सुरू केले आहे, २०४७ पर्यंत भारताला अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत, सरकारने तस्करी रोखण्यासाठी एक बहुआयामी रणनीती आखून देशात प्रतिबंधित औषधांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धचीमोहीम अधिक तीव्र केली आहे. 

अलिकडच्या काळात २२ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे शहर पोलिसांनी सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे सुमारे १ हजार ७०० किलो मेफेड्रोन जप्त केले.

१३ मे २०२३ रोजी  भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केरळ किनाऱ्याजवळील एका मोठ्या जहाजातून किमान २ हजार ५०० किलो ड्रग्ज जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे १२ हजार कोटी रुपये आहे. एका पाकिस्तानी नागरिकाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.

७ मार्च २०२३ रोजी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने कच्छ जिल्ह्यातील ओखाजवळ ४२५ कोटी रुपये किमतीचे ६१ किलो हेरॉईन  वाहून नेणाऱ्या पाच भारतीय क्रू सदस्यांसह एक इराणी बोट जप्त केली होती.

६ जून २०२३ रोजी देशव्यापी डार्कनेट-आधारित ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला. आणि अनेक तस्करांना अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठ्या प्रमाणात पार्टी ड्रग एलएसडी जप्त केले.

१ डिसेंबर २०२३ रोजी ओडिशातील पारादीप बंदरावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी २२ किलो कोकेन जप्त केले होते, त्याची किंमत २२० कोटी रुपये आहे.

१२ डिसेंबर २०२३ रोजी बेंगळुरूमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अमली पदार्थांच्या तस्करींपैकी एकामध्ये, केंद्रीय गुन्हे शाखेने २१ कोटी किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आणि एका नायजेरियन नागरिकाला अटक केली.

१२ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय नौदल आणि एनसीबीने समुद्रात सुमारे ५२९ किलो अत्यंत उच्चगुणवत्तेचे चरस, २३४ किलो उत्कृष्ट दर्जाचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि काही प्रमाणात हेरॉइन जप्त केले होते.

१९ एप्रिल २०२१ भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मासेमारीच्या जहाजातून ३ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले.


भारतीय नौदल आणि एनसीबी आणि गुजराथ एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत ३ हजार ८९ किलो अमलीपदार्थ जप्त; पाच पाकिस्तानी नागरिक अटकेत  भारतीय नौदल आणि एनसीबी आणि गुजराथ एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत ३ हजार ८९ किलो अमलीपदार्थ जप्त; पाच पाकिस्तानी नागरिक अटकेत Reviewed by ANN news network on २/२८/२०२४ ०३:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".