पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने नवी दिल्ली येथे १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ५१व्या जागतिक पुस्तक महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाचे पहिल्यांदाच स्वतंत्र दालन असणार असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी कळविली आहे.
पांडे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता मराठी मान्यवर लेखकांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी दिल्लीतील महाराष्ट्रीयन नागरिकांचे एकीकरण केले जाणार आहे.
पांडे पुढे म्हणाले, राज्यातील १०० कलाकार महाराष्ट्राची लोकधारा आणि शिववंदना सादर करणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आपली समृद्ध लोककला, वारसा यांचा समावेश असणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गणेशवंदना, दिवली नृत्य, गजी नृत्य, कोळी गीत, दहीहंडी, ढेमसा / रेला नृत्य, लावणी, मंगळागौर, महाराष्ट्रगीत मेडली, पंढरीची वारी, गोंधळ, शिवराज्याभिषेक असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. हा कार्यक्रम सुमारे ७० मिनिटांचा असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: