'रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड 'तर्फे शाळांसाठी स्वच्छतागृहांचा प्रकल्प

 


ग्लोबल ग्रँट मधून ६५ लाखाचा निधी 

पुणे: 'रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडत'र्फे चार शाळांसाठी स्वच्छतागृहांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.यासाठी रोटरी क्लब ऑफ स्टिलवॉटर यूएसए आणि रोटरी इंडिया फाऊंडेशन यांच्या ग्लोबल ग्रँट च्या सहाय्याने सुमारे पासष्ट लाखांचा निधी मिळाला आहे.या प्रकल्पासाठी मिळालेल्या अनुदानामध्ये एका वर्षासाठी या  स्वच्छतागृहांची देखभाल व आरोग्य प्रशिक्षणाचा खर्च समाविष्ट आहे.

 यातून पुण्याजवळील एकूण चार शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करणे, नवीन स्वच्छतागृह बांधणे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा बसवणे असा उपक्रम क्लबचे अध्यक्ष गिरीश ब्रह्मे आणि  ग्लोबल ग्रांट्स डायरेक्टर   दिलीप राईलकर यांच्या नेतृत्वाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने योजला आहे. ह्या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था संचालित व्ही एम आठवले हायस्कूल व ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था प्राथमिक शाळा(नसरापूर) आणि जिल्हा परिषद शाळा(वाडा शिवापूर) येथे करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन, प्रफुल्ल पेंढारकर, संजय बापट, प्रसाद कुंभोजकर, मकरंद कुलकर्णी, देवदत्त हंबर्डीकर, सत्यजित बडवे, चंद्रकांत डांगे इत्यादी रोटेरियन्सच्या मुख्य टीमने गेल्या काही महिन्यांपासून केले आहे.

या शाळांमध्ये शिकणारे सुमारे १५०० विद्यार्थी या प्रकल्पांचे लाभार्थी असतील. हे तीन प्रकल्प आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या  बारामती येथील देशपांडे शाळेतील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण याच निधीतून केले जाईल.  येथेही भूमिपूजन रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सहकार्याने लवकरच होणार आहे.दि. २६ जानेवारी रोजी नसरापूर आणि वाडा शिवापूर येथील भूमिपूजनासाठी,  क्लबचे ४० सदस्य उपस्थित होते.  शाळांचे पदाधिकारी व ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शाम दलाल यांनी सर्व व्यवस्था केली होती.
'रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड 'तर्फे शाळांसाठी स्वच्छतागृहांचा प्रकल्प 'रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड 'तर्फे शाळांसाठी स्वच्छतागृहांचा प्रकल्प Reviewed by ANN news network on २/०२/२०२४ १२:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".