हिंजवडी पोलिसांची कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने एका सराईत मोटरसायकल चोरास अटक केली असून त्याच्याकडून तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या बारा चोरलेल्या मोटरसायकल्स जप्त केल्या आहेत. यामुळे हिंजवडी, देहुरोड, वाकड, तळेगाव, चिखली, हडपसर, इंदापूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकंदर बारा गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक केलेल्या आरोपीचे नाव सूर्यकांत बळीराम आडे असे असून त्याचे वय 25 वर्षे आहे. तो जगताप कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे येथे रहात होता. त्याचे मूळगाव वाशिममधील कोल्ही हे आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठांनी प्रत्येक पोलीसठाण्याला मोटरसायकलचोरांचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे पथक तपास करत असताना पोलीस हवालदार केंगले यांना आरोपीविषयी माहिती मिळाली. तो वाकड पुलानजिक थांबला असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसीखाक्या दाखवल्यानंतर त्याने केवळ चैनीसाठी पैसे मिळावेत म्हणून वाहन चोऱ्या केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी त्याच्याकडून १२ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉक्टर संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडीचे निरीक्षक श्रीराम पौळ. निरीक्षक गुन्हे सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक राम गोमारे, अंमलदार बंडू मारणे, बापूसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, मंगेश सराटे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: