विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथील परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळेत लेखनिक पदावर कार्यरत असलेले पनवेल तालुक्यातील साई गावचे भूमिपुत्र असलेले मदनलाल नारायण मोकल यांचा सेवापूर्ती गौरव कार्यक्रम चिरनेर माध्यमिक शाळा येथे शाळेचे उपाध्यक्ष तथा उद्योजक राजेंद्र खारपाटील यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात पार पडण्यात आला.
मदनलाल मोकल यांनी कोकण एज्यूकेशन सोसायटीच्या रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये योग्यतेने व जबाबदारीने लेखनिक पदावर काम पहिले आहे.सुरुवातीला पनवेल येथील के.वि.कन्याशाळा येथून सुरुवात करून त्यानंतर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील केळवणे ,व्ही.के.हायस्कूल पनवेल मध्यन्तरी खालापूर तालुक्यातील द.सी.जाधव माध्यमिक विद्यालय खरसुंडी येथे तर मागील २० वर्षांपासून चिरनेर माध्यमिक विद्यालयात काम केले असून ते या लेखनिक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
कामाशी तत्पर आणि शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कामाला नियमित महत्व देऊन ते वेळोवेळी पूर्णतःवास नेण्याचा ध्यास असलेले मनमिळावू आणि संयमी स्वभावाचे मदनलाल मोकल यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून चिरनेर येथील माध्यमिक शाळेतील २० वर्षाच्या कार्यात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात सर्वच मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा व्यक्त केली.
त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या संचालिका अर्चना ठाकूर,प्रशासकीय अधिकारी व्ही.ए.पाटील,उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील,परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरदास राऊत,दिघोडे येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नाथा नाईक,मोरा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर,इंग्रजी माध्यम शाळेच्या सुप्रिया पाटील,प्रा.मंथना म्हात्रे,शिक्षक वृंद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
चिरनेर शाळेतील मदनलाल मोकल यांचा सेवापुर्ती गौरव कार्यक्रम उत्साहात
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२४ ०९:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: