अट्टल वाहनचोरांची आंतरराज्य टोळी अटकेत; चोरांच्या टोळीत पोलीस शिपाई! (VIDEO)

 



तब्बल ११ कार्स हस्तगत

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने अट्टल वाहनचोरांच्या एका टोळीला बेड्या ठोकत त्यांच्याकडून तब्बल ११ कार जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या टोळीत एका पोलीस शिपायाचा समावेश आहे.

चाकण येथील पोलीसठाण्यात दाखल असलेल्या कारचोरीच्या एका प्रकरणाचा तपास करताना सहायक फौजदार महेश खांडे आणि हवालदार नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरून ५ जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून सातारा जिल्ह्यातील अट्टल वाहनचोर अझिम पठाण आणि त्याचा साथीदार शशिकांत काकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चाकण येथून चोरलेली एको कार आणि अन्य एक ब्रेझा कार ताब्यात घेण्यात आली. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून ही वाहनचोरांची आंतरराज्य टोळी असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकरणाचा तपास दरोडाविरोधी पथकाकडे सोपवला. 

पथकाने सखोल तपास करून या दोघांचे अन्य साथीदार राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर वय ३४ वर्षे राहणार पटवर्धन कुरोली, तालुका पंढरपुर, जिल्हा सोलापुर, महेश भिमाशंकर सासवे वय ३१ वर्षे, राहणार १६९ राघवेद्रनगर, विजापूर रोड, सोलापूर याना अटक केली.  त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत माने राहणार रहीमतपूर, विकास माने राहणार रहीमतपूर, भरत खोडकर राहणार सांगली, हाफिज राहणार मेरठ,  उत्तर प्रदेश,इलियास राहणार बंगळुरू आणि रसूल शेख राहणार इचलकरंजी यांचाही सहभाग या टोळीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पैकी भरत खोडकर हा पोलीस शिपाई आहे. या पैकी महेश सासवे या आरोपीला अटक केली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळल्या आहेत.

अझिम पठाण हा सराईत वाहनचोर आहे. २०२३ साली त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९ कार्स जप्त केल्या होत्या. तो दिल्ली येथे विमानाने जाऊन तेथे कार्स चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या महाराष्ट्रात विकत असे.

या टोळीकडून जप्त करण्यात आलेल्या ११ कार्सची किंमत १ कोटी ५७ लाख इतकी आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,डॉ. संजय शिंदे सह आयुक्त, वसंत परदेशी, अपर आयुक्त, स्वप्ना गोरे, उपआयुक्त, गुन्हे, बाळासाहेब कोपनर सहाय्यक आयुक्त, गुन्हे १, सहाआयुक्त सतीश माने, गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख, उपनिरीक्षक भरत गोसावी, अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे, हवालदार माळी, व शिपाई हुलगे, तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली.

अट्टल वाहनचोरांची आंतरराज्य टोळी अटकेत; चोरांच्या टोळीत पोलीस शिपाई! (VIDEO) अट्टल वाहनचोरांची आंतरराज्य टोळी अटकेत; चोरांच्या टोळीत पोलीस शिपाई! (VIDEO) Reviewed by ANN news network on १/१२/२०२४ १०:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".