बियरची बाटली तोंडावर मारली; आरोपीला जामीन मंजूर


खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील गुणदे फाटा येथील सदिच्छा हॉटेल या ठिकाणी कोणत्यातरी कारणास्तव टेबलावर बसलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून येऊन तोंडावर बियरची बाटली मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शैलेश सुरेश कदम राहणार भेलसई तालुका खेड जिल्हा रत्नागिरी याची आज खेड न्यायालयात 15 हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार हे घटना 7 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुणदे फाटा येथील सदिच्छा हॉटेल या ठिकाणी घडली आहे याबाबत सुमित उदय आंबरे राहणार आवाशी यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणारे शैलेश सुरेश कदम यांच्या विरोधात भादवी स कलम 324 ,323 ,326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून खेड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या वतीने ऍड अश्विन भोसले यांनी आरोपीतर्फे युक्तिवाद केला आरोपीतर्फे ऍड अश्विन भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायालयाने संशयित आरोपी शैलेश कदम याची पंधरा हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

बियरची बाटली तोंडावर मारली; आरोपीला जामीन मंजूर  बियरची बाटली तोंडावर मारली; आरोपीला जामीन मंजूर Reviewed by ANN news network on १/१२/२०२४ ०८:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".