विठ्ठल ममताबादे
उरण : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील विंधणे आदिवासी वाडी शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात आदिवासी कला नृत्य संस्कृतीचे दर्शन करणारी वेशभूषा व नृत्य अविष्कार शाळकरी मुलांनी सादर केले.'आदिवासी वादळ' या नृत्याविष्काराने रसिकांना आदिवासी संस्कृतीचा ठेवाच पहायला मिळाला.शाळकरी मुलांनी विविध अंगी ३८ नृत्याविष्कार गीते सादर करून रसिकजनांचे मनोरंजन देखील केले.
स्नेहसंमेलनात शालेय अंतर्गत संपन्न झालेल्या विविध स्पर्धामध्ये विजयी ठरलेल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आले.या वेळेस उरण कोमसाप (कोकण मराठी साहित्य परिषद )शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन करणा-या शाळकरी मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उपस्थित पालक व विद्यार्थी वर्गाला राजेश चोगले यांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमन कातकरी ,ग्रामपंचायत सदस्य दिपक कातकरी,रमेश पाटील,भरत पाटील,गोकुळदास कातकरी,रविंद्र कातकरी,माजी सरपंच महेश कातकरी , मुख्याध्यापक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विंधणे आदिवासीवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:३८:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:३८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: