शिवसंकल्प समालोचक असोसिएशनतर्फे स्व.गोपाळ वर्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विकलांग व्यक्तीस सायकल प्रदान

 



विठ्ठल ममताबादे

उरण : केवळ समालोचन आणि निवेदनातून समाज प्रबोधन हेच न करता मिळालेल्या मानधनातील काही रक्कम असोसिएशन कडे जमा करून सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक उपक्रमातून समाजातील गरीब आणि गरजूंना जी काही मदत करता येईल ती करण्याचा संकल्प घेऊन रायगड मधील नामवंत निवेदक रायगडभूषण नितेश पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ३३ सदस्य कार्यरत असणाऱ्या शिवसंकल्प समलोचक असोसिएशनची स्थापना झाली आहे. 

      असोसिएशन तर्फे चिरनेर येथील विनया आत्माराम नारंगीकर या विकलांग मुलीस देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी गोवठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिवंगत स्व.गोपाळ वर्तक यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र आणि असोसिएशन चे सचिव सुनिल वर्तक यांच्या सौजन्याने विकलांग सायकल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.सायकल प्रदान कार्यक्रमासाठी चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पद्माकर फोफेरकर, अभिनव सामाजिक संस्थेचे रवींद्र भगत, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ भगत, गणेश म्हात्रे, किरण नारंगीकर या मान्यवरांसमवेत असोसिएशन चे उपाध्यक्ष शाम ठाकूर,सचिव सुनिल वर्तक, सल्ला
शिवसंकल्प समालोचक असोसिएशनतर्फे स्व.गोपाळ वर्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विकलांग व्यक्तीस सायकल प्रदान शिवसंकल्प समालोचक असोसिएशनतर्फे स्व.गोपाळ वर्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विकलांग व्यक्तीस सायकल प्रदान Reviewed by ANN news network on १/२९/२०२४ ११:३४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".