विठ्ठल ममताबादे
उरण : शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या शुभहस्ते द्रोणागिरी नोड फेरीवाला वेल्फर असोसिएशनचे द्रोणागिरी शहरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.द्रोणागिरी नोड फेरीवाला वेल्फर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ भोईर यांच्या सौजन्याने जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे, यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी द्रोणागिरी नोड फेरीवाला वेल्फर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ भोईर व पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन या जनसंपर्क कार्यालयातून फेरीवाले, हात गाडीवाले व हातावर व्यवसाय करणारे बांधवांची कामे व्हावीत व त्यांना योग्य न्याय मिळावा अशा अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सोमनाथ भोईर यांनी माजी आमदार मनोहर भोईर व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर कार्यक्रमास उरण उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे, सोनारी गावचे अध्यक्ष शंकर तांडेल, करंजा माजी सरपंच मंगेश थळी, युवा नेते दीपक भोईर, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, सोशल मीडिया समन्वयक नितिन ठाकूर,उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, वाहतूक विभागाचे विधानसभा अध्यक्ष करण पाटील,युवासेना अधिकारी हितेश घरत, शिक्षक पतसंस्थेचे संचालक रमणीक म्हात्रे, उद्योजक प्रवीण पाटील,फेरीवाला संघटना द्रोणागिरी नोड उपाध्यक्ष रेष्मा काठे, सेक्रेटरी संदिप सावंत, सदस्य बापु गरूड, सदस्य जना,गायक निलेश मुंबईकर, मनोज भोईर, जगदिप भोईर, संतोश म्हात्रे, दिलिप म्हात्रे, रूचिता मॅडम, मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
द्रोणागिरी नोड फेरीवाला वेलफेअर असोसिएशनच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:४२:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ११:४२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: