देहविक्रय करताना आढळल्या ११ तरुणी; ५ जणांवर गुन्हा दाखल!!
पुणे : बालेवाडी परिसरात व्हॉट्सअॅपद्वारे चालविल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छापे घातले.एकंदर तीन ठिकाणी हे छापे घालण्यात आले. यापैकी दोन हॉटेल्स असून एका इमारतीतील अपार्टमेंटमध्येही वेश्याव्यवसाय सुरू होता. या ठिकाणी ११ तरुणी देहविक्रय करताना आढळल्या. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या ५ जणांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी तक्रार दिली असून राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रॉकी कदम, दिनेश उर्फ मामा, नवीन, रोशन (नाव पत्ता महित नाही) अशी आरोपींची नावे आहेत.
बालेवाडी परिसरात काहीजण व्हॉट्सअॅपद्वारे वेश्याव्यवसाय चालवित असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी नीट माहिती काढून बनावट ग्राहक पाठवत हॉटेल टॅग हाऊस, पॅनकार्ड क्लब रोड वरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेल येथे छापे घातले. त्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील ११ तरुणी देहविक्रय करताना सापडल्या.
Reviewed by ANN news network
on
१/२५/२०२४ ०९:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: