राजापूर : राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष व राजापूर शहरातील प्रतिथयश ए डी मालपेकर ज्वेलर्स चे मालक संदीप मालपेकर यांच्या सतर्कतेमुळे गेल्या आठवड्यात शहरातील भटाळी येथे झालेल्या घरफोडीतील संशयीत आरोपीला मुद्देमालासह जेरबंद करण्यात राजापूर पोलिसाना यश आल्यामुळे विभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यानी संदीप मालपेकर यांचा शाल व श्रीफळ देवुन राजापूर पोलिस स्थानकात सत्कार केला आहे .
संदीप मालपेकर यांच्या या सतर्कतेबद्दल समाजाच्या विविध स्तरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे . २० जानेवारी रोजी रात्री शहरातील भटाळी येथे विजयकुमार पंडीत यांच्या घरी चोरट्याने दागिण्यांवर डल्ला मारला होता . त्यानंतर राजापूर पोलिस ॲक्शन मोडवर आले होते . या चोरी प्रकरणाचा तपास युध्द पातळीवर सुरु असताना तपासाचा एक भाग म्हणुन राजापूर पोलिसानी राजापूर पोलिसानी शहरातील सर्व सुवर्णकाराना एक नोटीस वजा सुचना पत्रक जारी केले होते . त्यामध्ये या चोरीतील माल जर कोणी विकण्यासाठी आला तर त्याची कल्पना राजापूर पोलिसाना देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले होते .
काल ए डी मालपेकर ज्वेलर्सचे मालक संदीप मालपेकर याना हे पोलिसांचे पत्र मिळताच त्यानी त्याबाबत समयसुचकता दाखवत हे पत्र रत्नागिरी जिल्हा सुवर्णकार संघटनेच्या व्हॉटस ॲप गृप वर टाकले होते . त्यामुळे राजापूर पोलिसांचे हे आवाहन संपुर्ण जिल्हाभरातील सुवर्णकारांपर्यंत पोहोचले होते .
दरम्यान रत्नागिरीतील सराफ संघटनेचे अध्यक्ष संतोष खेडेकर व राजापूरचे सुवर्णकार व व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या सतर्कतेमुळे चोर तात्काळ जेरबंद होण्यास मदत झाली आहे. सदर व्यक्ती ही हे चोरलेले दागिने रत्नागिरीतील एका खासगी बँकेन गहाण ठेवण्यासाठी गेली होती, तेथून त्यांना मुल्यांकणासाठी सोनाराकडे पाठविण्यात आले. दरम्यान राजापुरातील या चोरी प्रकरणानंतर पोलीसांनी सुवर्णकारांना एक पत्र देऊन अशा प्रकारे कोण दागिने विक्रीसाठी आले तर पोलीसांना कळवावे असे पत्र दिले होते. हे पत्र मालपेकर यांनी रत्नागिरी जिल्हा सुवर्णकार ग्रुपवरही शेअर केले होते. त्यामुळे मुल्यांकणासाठी आलेले दागिने हे राजापुरातील चोरीतील असल्याचा दाट संशय आल्याने तात्काळ रत्नागिरीतील सुवर्णकारांनी राजापुरात संदीप मालपेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मालपेकर यांनी तात्काळ राजापूर पोलीसांत याबाबत माहिती दिली. तसेच पंडीत यांनाही दागिन्यांचे फोटो दाखवून हे दागिने त्यांचे आहेत काय याबाबत खात्री करण्यात आली. ते पंडीत यांचेच होते, तात्काळ रत्नागिरी व राजापूर पोलीसांनी संशयीत आरोपी सुमेध कुळकर्णी याला रंगेहाथ मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली आहे .
संदीप मालपेकर यानी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे व त्यानी सोशल मिडियाचा योग्य वापर केल्यामुळे राजापूर पोलिसाना मुद्देमालासह संशयीत आरोपीला अटक करण्यात यश आले आहे . त्यामुळे राजापूर पोलिसानी विभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या उपस्थितीत संदीप मालपेकर यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला आहे .
Reviewed by ANN news network
on
१/२५/२०२४ ०९:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: