१९८४ च्या उरण आंदोलनातील हुतात्म्यांना ४० व्या स्मृतीदिनी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले अभिवादन







विठ्ठल ममताबादे

उरण : न्हावा-शेवा प्रकल्पासाठी भू- जमीन संपादनाच्या वेळी १९८४ ला लोकनेते माजी खासदार स्व. दि. बा. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात पाच हुतात्मा व शेकडो शेतकरी जखमी झाले होते, या आंदोलनातील कै. नामदेव शंकर घरत, कै. रघुनाथ अर्जुन ठाकूर, कै. महादेव हिरा पाटील, कै. केशव महादेव पाटील व कै.कमलाकर कृष्णा तांडेल या पाच हुतात्म्यांना ४० व्या स्मृतीदिनी १६ जानेवारी रोजी माजी आमदार  मनोहर भोईर यांनी हुतात्मा मैदान, जासई, तसेच धुतुम व चिरले येथे जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शिवसेना उरण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख  महादेव घरत, शिक्षकनेते नरेश मोकाशी, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, डोंगरीचे माजी सरपंच निलेश घरत, जासई उपविभागप्रमुख राजन कडू, प्रेमनाथ ठाकूर, धुतुम शाखाप्रमुख कुंदन पाटील, उपसरपंच रविनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत ठाकूर, उपसरपंच  कविता पाटील,  ग्रामपंचायत  सदस्या सुचिता कडू, महिला आघाडीच्या तृप्ती ठाकूर, कांतीलाल ठाकूर, काशिनाथ पाटील, नामदेव पाटील, शरद ठाकूर, हेमंत ठाकूर, सज्जन ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, हुतात्म्यांचे वारसदार लक्ष्मण ठाकूर, जितेंद्र घरत व कार्यकर्ते उपस्थित होते


१९८४ च्या उरण आंदोलनातील हुतात्म्यांना ४० व्या स्मृतीदिनी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले अभिवादन  १९८४ च्या उरण आंदोलनातील हुतात्म्यांना ४० व्या स्मृतीदिनी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले अभिवादन Reviewed by ANN news network on १/१८/२०२४ १२:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".