पिंपरी : पिंपरीतील प्रभाग क्रमांक २८ रहाटणी- पिंपळे सौदागर ते पिंपरी या पुलाचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नाना काटे यांनी दि. २९ जानेवारी रोजी संबंधीत मनपा अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत केली.
यावेळी पिंपरीकडील बाजूच्या शेवटच्या स्लॅबचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे त्यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने हे काम व्यवस्थित आणि लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना काटे यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना केल्या.
यावेळी प्रकल्प कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, उपअभियंता अभिमान भोसले, ठेकेदार व्ही. एम. मातेरे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश तनवे, इंजिनियर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ०८:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: