राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस, देशभरातील ४७० अव्वल नौकानयनपटूंचा सहभाग

 


पिंपरी : आशियाई स्पर्धेतील मेन्स पेअर प्रकारातील कांस्यविजेती जोडी बाबूलाल यादव व लेखराम तसेच मेन्स फोर प्रकारातील पुनीत कुमारजसविंदर सिंगभीमसिंग व आशिष यांच्या संघाकडे पुण्यातील आर्मी रोइंग संकुलात आजपासून सुरू झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय रोइंग स्पर्धेतील विजेतेपदासाठी सर्वांचे लक्ष राहील. आशियाई स्पर्धेत सिंगल स्कल्समध्ये चौथे स्थान मिळविणारे बलराज पन्वर यांच्यावरही सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.

मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज येथील आर्मी रोइंग नोड येथे सीएमई कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश, महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटेअखिल भारतीय रोइंग संघटनेचे खजिनदार नबाबुद्दीन अहमद, आयोजन समितीचे अध्यक्ष कमांडंट ए. एस. कंवर, संयोजन सचिव कर्नल आर. रामकृष्णन यांच्या उपस्थितीत वरिष्ठ गट राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशीप स्पर्धेचे उद्घाटन झाले. देशभरातील अव्वल ४७४ खेळाडू विविध गटातील विजेतेपदासाठी या स्पर्धेमध्ये झुंज देत असून देशातील अव्वल २७ संघांमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्डआर्मी स्पोर्ट्स बोर्डतसेच अखिल भारतीय पोलीस दल यांचा समावेश आहे.


लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश म्हणाले, आर्मी रोईंग नोड येथे ४१ वी सीनियर आणि २५ वी ओपन स्प्रिंट नॅशनल रोइंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून आलेल्या सर्वात उत्साही आणि स्पर्धात्मक नौकानयनपटू (रोअर्स) येथे उपस्थित आहेत ही माझ्यासाठी खरोखरच खूप सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये २७ राज्यांतील सुमारे ४५० रोअर्स विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहेत. स्पर्धात्मक खेळांनी आपल्या देशात खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि आशियाई गेम्समध्ये आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आपल्या कामगिरीवरून हे दिसून येते की आपले खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळांना आव्हान देण्यास सक्षम आहेत.

संयोजन सचिव कर्नल आर. रामकृष्णन म्हणालेदेशाची सेवा करणाऱ्या सेनादलाचे खेळाडू अव्वल असलेल्या रोइंगची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करताना आनंद होत आहे. देशभरातील सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेसाठी पुण्यात आले असून सलग आर्मी रोइंग नोड येथे स्पर्धेचे आयोजन करताना सीएमईला अभिमान वाटत आहे.

सन २००९ मध्ये स्थापना झालेल्या आर्मी रोइंग नोडने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा ही स्पर्धा आयोजित केली असून २०१४ मध्ये पहिली२०१७ मध्ये ३६वी आणि नंतर ३७३९४० व ४१ वी स्पर्धाही येथे पार पडल्याचे आर. रामकृष्णन यांनी नमूद केले. मंगळवारपासून पुरुष व महिला गटातील प्रत्येकी सात गटांमध्ये स्पर्धा रंगणार आहेत.

पुरुष गटात ३१८तर महिला गटात १५६ स्पर्धक सहभागी होत आहेत. पुरुष गटात सिंगल स्कल्सडबल स्कल्सकॉक्सलेस पेअर व कॉक्सलेस फोरमध्ये २००० मी. व ५०० मी.च्या शर्यती होतील. तसेच ओपन डबल स्कल्सकॉक्सलेस फोर व कॉक्सलेस एट गटात २००० मी. शर्यती होतील.

महिला गटात सिंगल स्कल्सडबल स्कल्सकॉक्सलेस पेअर व कॉक्सलेस फोरमध्ये २००० मी. व ५०० मी. च्या शर्यती होतील. डबल स्कल्स ५०० मी. व अपंग पुरुष गटात सिंगल स्कल्स २०० व ५०० मी. च्या शर्यतींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहआयोजकत्वाने व रोइंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तसेच आर्मी रोइंग नोड, सी.एम.ई, पुणे यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस, देशभरातील ४७० अव्वल नौकानयनपटूंचा सहभाग राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस, देशभरातील ४७० अव्वल नौकानयनपटूंचा सहभाग Reviewed by ANN news network on १/२९/२०२४ ०८:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".