रत्नागिरी : कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेला काल भेट देवून पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आय ए एस जस्मीन, विशाल खत्री, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, गट विकास अधिकारी जे पी जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत सर्वच शाळांमध्ये परसदारी बाग, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था, परिसर स्वच्छता याबाबत दक्षता घेवून आवश्यक तेथे बदल करुन, काम करण्याची सूचना आयुक्त कल्याणकर यांनी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार यांनी यावेळी शाळेबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेमधील स्वच्छता गृहे, वर्ग, स्वयंपाक घर, परिसर पाहून आयुक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
Reviewed by ANN news network
on
१/१८/२०२४ १२:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: